Monday, December 23, 2024
Homeक्राईमकार अपघातातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

कार अपघातातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

-

जळगाव प्रतिनिधी | हॉटेलमध्ये मित्रांसोबत जेवण करून घरी परतत असताना कारचा ताबा सुटून ती थेट झाडावर धडकून झालेल्या अपघातात एकजण ठार झाला झाल्याची घटना रविवारी १४ जुलै रोजी होता. तर गंभीर जखमी झालेल्या योगेश भालचंद्र रेंभोटकर (वय ५५, रा. ) यांच्यावर खासगी व जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. तीन दिवसानंतर त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली असून बुधवारी १७ रोजी सायंकाळी सहा वाजता च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील कासमवाडी परिसरातील आनंद सोनवणे हे रविवारी 14 जुलै रोजी त्यांचे मित्र भैरव उर्फ मुन्ना भगवान राणे, प्रवीण उर्फ पप्पू आढाव, व योगेश भालचंद्र रेंभोटकर यांच्यासोबत (एचएच १९, सीझेड १२१२) क्रमांकाच्या कारने शिरसोली रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण करून घरी परतत असताना दुपारी 4 वाजता त्यांची कार झाडावर धडकली. या भीषण अपघातात आनंद सोनवणे हे जागीच ठार झाले. तर योगेश रेंभोटकर यांच्यासह दोघे गंभीर जखमी झाले होते. तिघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातात गंभीर जखमी असलेल्या योगेश रेंभोटकर यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार करून त्यांनाही नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवसांपासून त्यांची मृत्यूसोबत सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.

उपचार सुरु असतांना योगेश रेंभोटकर यांची प्रकृती अधिकच खालावल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मात्र त्यांची प्राणज्योत मालवल्यानंतर जिल्हा रुग्णालयात त्यांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, वहिनी, दोन बहिणी असा परिवार आहे.

Related articles

ताज्या बातम्या