वरणगाव प्रतिनिधी | वरणगाव शहरातील वामन नगरात किरकोळ कारणावरून एकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण करून जखमी करून धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सकाळी 9 वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, खुशाल भालचंद्र वय-54 रा. वामन नगर वरणगाव हे प्रौढ व्यक्ती हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान मंगळवारी 16 जुलै रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास ते बसस्थानक जवळ असताना नवाब शहा युसुफ शहा रा. प्रतिभा नगर, वरणगाव याने काहीही कारण नसताना सुशील भालशंकर याला शिवीगाळ करत जमिनीवर ढकलून देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच त्याला धमकी दिली. ही घटना घडल्यानंतर सुशील भालशंकर यांनी वरणगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार सकाळी 9 वाजता नवाब शहा युसुफ शहा यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नागेंद्र तायडे करीत आहे.