Monday, December 23, 2024
Homeक्राईम"कुठं निघून गेली गं आई" लेकरांनी फोडला टाहो ; मातेचा टोकाचा निर्णय

“कुठं निघून गेली गं आई” लेकरांनी फोडला टाहो ; मातेचा टोकाचा निर्णय

-

जळगाव प्रतिनिधी ।द् शहरातील कानळदा रोडवरील ओम साई नगरातील एका ४४ वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ३० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता समोर आली आहे. महिलेचे दोन्ही लेकरं शाळेतून घरी असल्यानंतर त्यांनी एकच टाहो फोडल्याचे पहायला मिळाले. याप्रकरणी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राणी शामकांत देशमुख वय ४४ रा. ओम साई नगर, जळगाव असे मयत महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील कानळदा रोडवरील ओम साई नगरात राणी देशमुख या महिला पतीसह दुर्गेश आणि दर्शन ही दोन मुलांसह वास्तव्याला होत्या. पती शामकांत देशमुख हे एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला आहे. मंगळवारी ३० जुलै रोजी दुपारी दोन्ही मुले शाळेत गेली होती. तर पती हे कामाला कंपनीत निघून गेले. दरम्यान, घरात कुणीही नसतांना महिलेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही. सायंकाळी ५ वाजता दोन्ही मुले घरी आले तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शर्मा यांच्यासह पोहेकॉ अनिल फेगडे, पो.कॉ.अनिल मोरे, रामकृष्ण इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला. मयत महिलेच्या पश्चात पती आणि दोन मुले असा परिवार आहे.

Related articles

ताज्या बातम्या