जळगाव दिनांक २७ जून | सुप्रिम कॉलनीतील पांडे किरणाजवळ गांजा ओढणाऱ्या दोन जणांवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील अनेक भागात दिवसाढवळ्या सर्रासपणे दारुसह गांजा ओढला जात असतो. अशा व्यक्तींवर कारवाई करण्याच्या सूचना संबंधित पोलिसांना देण्यात आल्या आहे. त्यानुसार जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरातील पांडे किरणाजवळ काही जण सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीसांनी बुधवारी २६ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता सुप्रिम कॉलनी परिसरातील पांडे किरणाजवळ कारवाई केली. याप्रकरणी दीपक प्यारेलाल चव्हाण (वय २२, रा. सुप्रिम कॉलनी) व विशाल केशरीनंदन शुक्ला (रा. ३२, सुप्रिम कॉलनी) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गांजा ओढण्याचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री १० वाजता दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश शिरसाळे व विकास सातदिवे हे करीत आहे.