Sunday, January 12, 2025
Homeक्राईमचोरीच्या दागिन्यांसह चोरट्याच्या आवळल्या मुसक्या ; भुसावळ बाजारपेठ पोलीसांची कारवाई

चोरीच्या दागिन्यांसह चोरट्याच्या आवळल्या मुसक्या ; भुसावळ बाजारपेठ पोलीसांची कारवाई

-

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरातील गुंजाळ कॉलनीत वृद्धाचे बंद कर फोडून घरातून २ लाख ६९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे चांदीचे दागिने व रोकड चोरून नेणाऱ्या संशयित आरोपीला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी बुधवार ३१ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता अटक केली असून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील गुंजाळ कॉलनीतील रामप्रसाद गोपाल चंदन वय-६६ यांचे बंद घर २९ जुलै रोजी फोडून घरातून सोन्याचे चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ६९ हजार चोरून नेला होता. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्याचा शोध सुरू असतांना चोरी संशयित आरोपी जावेद शेख शकील वय-२५, रा. रामदास वाडी, खडका रोड भुसावळ याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल विजय नेरकर, निलेश चौधरी, जावेद शहा, राहुल वानखेडे, योगेश पवार, सचिन चौधरी यांनी कारवाई करत संशयित आरोपी जावेद शेख शकील याला अटक केली. त्याच्याकडून चोरीला गेलेले सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीसांकडून पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.

Related articles

ताज्या बातम्या