Monday, December 23, 2024
Homeक्राईमतरूणाची राहत्या घरातील तिसऱ्या मजल्यावर घेतला टोकाचा निर्णय

तरूणाची राहत्या घरातील तिसऱ्या मजल्यावर घेतला टोकाचा निर्णय

-

जळगाव प्रतिनिधी | तालुक्यातील म्हसावद येथील २१ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी २८ जुलै रोजी रात्री १० वाजता समोर आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. केतन राजेंद्र भोई (वय २१, रा. म्हसावद, ता. जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, केतन भोई हा तरूण आपल्या आई व दोन भावांसह जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे वास्तव्याला होता. तो एका कंपनीत कामाला होता. रविवारी २८ जुलै रोजी राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर त्याने गळफास घेवून आत्महत्या केली. रात्री १० वाजता जेवणाची वेळ झाल्याने केतन समोर दिसत नसल्याने त्याच्या आईने त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र मोबाईल लागत नव्हता. त्याला पाहण्यासाठी भाऊ वरील तिसऱ्या मजल्यावर गेला असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. त्यावेळी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related articles

ताज्या बातम्या