Monday, December 23, 2024
Homeक्राईमभरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने तरुण ठार: जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने तरुण ठार: जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

-

जळगाव प्रतिनिधी |  भरधाव दुचाकी दुभाजकाच्या खांब्यावर आदळल्याने तरुण जागीच ठार झाल्याची घटना शहरातील बेंडाळे चौकात घडली आहे. घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  मयूर नरेंद्र पाटील (वय २५, रा. खोटे नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खोटे नगर परिसरात मयुर पाटील हा तरूण आपल्या आई, वडील, भाऊ, पत्नी व मुलगी यांच्यासह राहत होता. त्यांचे खोटे नगर स्टॉपवर गॅरेज आहे. त्यावरच तो उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, शनिवारी १३ रोजी रात्री ११.३० ते १२ वाजेच्या सुमारास मयूर हा दुचाकीने पांडे चौकाकडून बेंडाळे चौकात जात होता. त्यावेळेला नागोरी चहा समोरील दुभाजकावर दुचाकी आदळली.  या भीषण धडकेत मयूरचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related articles

ताज्या बातम्या