Monday, December 23, 2024
Homeक्राईमभरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत शेतमजुराचा दुदैवी मृत्यू

भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत शेतमजुराचा दुदैवी मृत्यू

-

जळगाव प्रतिनिधी । कामावरून दुचाकीने घरी जाण्यासाठी निघालेल्या वृध्दाचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १९ जुलै रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालुक्यातील कठोरा गावाजवळ घडली. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. पेमा सूडया बारेला (वय ६८, रा. किसन फलिया, लिंबाई पो. इंद्रापूर ता. राजपूर जि. बडवाणी, मध्यप्रदेश) असे मयत वृध्दाचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, पेमा बारेला हे वृध्द आपल्या कुटुंबासह जळगाव तालुक्यातील कठोरा येथे वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी १९ जुलै रोजी रात्री ९ वाजता ते दुचाकीने कामावरून घरी जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीचा जोरदार धडक दिली. या अपघातात पेमा बारेला हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले यावेळी नातेवाईकांनी रूग्णालयात एकच आक्रोश केला होता. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Related articles

ताज्या बातम्या