Monday, December 23, 2024
Homeक्राईममार्केटमधील चार दुकाने फोडली, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

मार्केटमधील चार दुकाने फोडली, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

-

जळगाव प्रतिनिधी | दाणाबाजार परिसरात चोरीचे सत्र सुरूच असून रविवारी १४ जुलै रेाजी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास पुन्हा चार दुकानांचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख ५० हजार ५०० रुपयांसह धान्याचे पोते चोरून नेले. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून मंकी कॅप घालून आलेल्या एका जणाने चोरी केल्याचे दिसत आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील दाणाबाजार परिसरात गेल्या काही दिवसांपासून सतत चोरीच्या घटना घडत आहे. १० रोजी एका दुकानात चोरीची घटना घडून तो गुन्हा दाखल होत नाही तोच पुन्हा रविवारी चोरट्याने चार दुकाने फोडली. या परिसरातील लक्ष्मीनारायण झवर ॲण्ड सन्स या दुकानाचे पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास कुलूप तोडून दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले. तसेच जयहिंद ट्रेडिंग दुकान, दर्शन ट्रेडिंग कंपनी व राज ट्रेडिंग कंपनी या दुकानांचेही कूलूप तोडून तेथून एकूण ५० हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेली. या सर्व चोरी पहाटे ३.३० ते ४.३० वाजेच्या दरम्यान झाल्या आहेत. चोरी करणारा चोरटा सीसीटीव्हीत कॅमेरात कैद झाला आहे. दुकानात प्रवेश केल्यानंतर त्याने ड्रावर उघडले, साहित्य फेकले असे फुटेजमध्ये दिसून येत आहे. याचोरी संदर्भात अशोक लक्ष्मीनारायण झवर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related articles

ताज्या बातम्या