Monday, December 23, 2024
Homeक्राईममोठी बातमी : गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसासह संशयिताला अटक

मोठी बातमी : गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसासह संशयिताला अटक

-

रावेर-प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील पाल रस्त्यावरील पंजाबी ढाब्यावर रावेर पोलीसांनी एकाला गावठी पिस्तूलासह जीवंत काडतूससह अटक केली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इरफान नबाब तडवी (वय-३६, रा. सहस्त्रलिंग, ता. रावेर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

रावेर तालुक्यातील पाल ते रावेर रस्त्यावरील पंजाबी ढाब्याव इरफान तडवी हा गावठी बनावटीचा पिस्तूल व जिवंत काडतूस घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. पथकाने कारवाई करत संशयित आरोपी इरफान तडवी याला अटक केली. त्यांच्याजवळून १६ हजार रूपये किंमतीचा गावठी बनावटीचा पिस्तूल आणि जीवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.उपनिरीक्षक सचिन नवले करीत आहेत.

या प्रकरणाची माहिती अशी आहे की, पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधिक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलिस अधिक्षक फैजपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पो.उपनिरीक्षक सचिन नवले, सुनिल पाटील, पोहेकॉ महेंद्र महाजन, अनिल इंगळे, गणेश मनुरे, जगदिश पाटील, पोकॉ विशाल शिवाजी पाटील, महेश मोगरे, पोकॉ प्रमोद पाटील, सचिन घुगे, समाधान ठाकूर यांनी संयुक्त कारवाई केली.

Related articles

ताज्या बातम्या