Monday, December 23, 2024
Homeजळगाववरणगाव येथे राज्य राखीव पोलीस बलाचे प्रशिक्षणच्या नवीन गट निर्माण करण्याच्या निर्णयाला...

वरणगाव येथे राज्य राखीव पोलीस बलाचे प्रशिक्षणच्या नवीन गट निर्माण करण्याच्या निर्णयाला मंजुरी

-

वरणगाव प्रतिनिधी | मंत्री मंडळ बैठकीत वरणगाव येथे राज्य राखीव पोलीस बलाच्या नवीन गट निर्माण करण्याचा निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी एक हजार 380 नवीन पदे तसेच 152 कोटी 23 लाख रुपये खर्चाला झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्याची माहिती भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी दिली.

वरणगाव येथे युतीच्या काळात 1996 पोलीस प्रशिक्षण केंद्र मंजूर होते. मात्र ते तांत्रिक दृष्ट्या अडचणीचे असल्याने 1999 मध्ये राज्य राखीव बल गटाची स्थापना करण्यात आली. तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी या केंद्राचे भूमिपूजनही केले. यानंतर पुन्हा हे केंद्र रखडले. यानंतर ऑगस्ट 2019 मध्ये या ठिकाणी राज्य राखीव पोलीस बल गट 19 च्या केंद्राला मान्यता देण्यात आली होती. यासाठी निधीही मंजूर केला होता. यानंतर राज्यात विधानसभा निवडणूक होऊन राज्यात महाआघाडीचे सरकार आले. या काळात जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी नगर जिल्ह्यातील कुसडगाव येथे केंद्र पळविले. यामुळे भुसावळसह विभागात राजकारण पेटले होते. मात्र या सर्व प्रकरणी आमदार संजय सावकारे यांनी यशस्वी पाठपुरावा करुन 5 जूलै रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत वरणगाव येथे पुन्हा राज्य राखीव पोलिस बलाची नवीन तुकडी स्थापन करण्याच्या निर्णयाला मंत्रीमंडळाची मंजूरी मिळवली. अशी माहिती भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी शुक्रवारी 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता दिली.

Related articles

ताज्या बातम्या