Monday, December 23, 2024
Homeक्राईमव्यापाऱ्याची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

व्यापाऱ्याची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

-

जळगाव दि.२७ जून |  जळगाव शहरातील एका व्यापाऱ्याला शेअर मार्केटच्या नावाखाली ५ लाख ९५ हजार ७५० रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी सायबर पोलीसांनी दोन संशयित आरोपींना दिल्ली येथून अटक केली आहे.

हेमेंद्र राजेंद्र शर्मा (वय ५६ वर्ष, रा. जय नगर, जळगाव) यांना शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतवण्यासाठी त्यांना माहिती हवी असल्याने त्यांनी फेसबुकवर राम इन्व्हेस्टमेंट अकॅडमी नावाने जाहिरात पाहिली. त्या जाहिरातीच्या लिंकवर त्यांनी क्लिक केले असता त्यांना एका व्हाट्सअप ग्रुपवर जॉईन करण्यात आले. त्या ग्रुपवर गुरुराम आणि दिया नावाच्या एडमिनने एक लिंक पाठवली. लिंकवर गेल्यावर शेअर मार्केट संबंधित क्लास घेण्यासाठी सांगण्यात आले होते. तसेच फिर्यादींना संशयित आरोपी यांनी विविध प्रलोभन दिले होते.

त्यानुसार ८ फेब्रुवारी ते ८ एप्रिल २०२४ पर्यंत अनोळखी इसमाने फिर्यादीचा विश्वास संपादन करून शेअर्स खरेदी विक्रीचे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली त्यांच्या नावाने इन्स्टिट्यूशनल अकाउंट तयार करण्यास सांगून फिर्यादीला विविध कारणांसाठी आणि चार्जेस नावाखाली एकूण ५ लाख ९५ हजार ७५० रुपये विविध बँक खात्यावरून संशयित आरोपींनी घेऊन आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी  जळगाव सायबर पोलिस ठाण्यात २७ एप्रिल  रोजी गुन्हा दाखल झाला होता. दाखल गुन्ह्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी एक पथक तयार केले होते.

या पथकाने २४ जून ते २५ जूनदरम्यान दिल्ली येथे जाऊन सीडीआरच्या माहितीवरून सापळा  रचला. त्यानुसार दिल्लीच्या पटेल नगर भागातून रणजीत सिंग मदन कुमार (वय ४३, रा. जहांगीरपुरा, दिल्ली), प्रवीण कुमार बीरेंद्र शाही (वय ४४, रा.  द्वारका, दिल्ली) या दोघांना अटक केली आहे.

Related articles

ताज्या बातम्या