अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर येथे आदिवासी कोळी समाज बांधवांना जात प्रमाणपत्र मिळण्याच्या मागणीसाठी १५ जुलै रोजी पासून बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसले आहे. परंतु ८ दिवस झाले असुन प्रशासन व शासन लक्ष देत नाही आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनातील उर्वेश साळुंखे या तरूणाने अमळनेर प्रांत कार्यालयाच्या गेटवर बसून लक्षवेधी आंदोलन केल्याचे पहायला मिळाले.
यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणबाजी करण्यात आली. आंदोलनाच्या ठिकाणी जगन्नाथ बाविस्कर, मधुकर गरु सोनवणे, प्रवर्तनचे मदन शिरसाठे ,हिलाल सैदाणे, रामचंद्र सपकाळे, शांताराम कोळी, रावसाहेब शिरसाठ, भुषण कोळी, भिमराव कोळी, उखा कोळी, गजानन कोळी, सागर सोनवणे, सुनील कोळी, वसंत महाराज, साहेबराव कोळी, सुखदेव सोनवणे, अशोक कोळी , सुभाष रामसिंग,यांच्या सह समाज बांधव उपस्थित होते.