Sunday, December 22, 2024
Homeक्राईमपैशाच्या वादातून तिघांकडून धारदार शास्त्राने वार; तरुण गंभीर जखमी

पैशाच्या वादातून तिघांकडून धारदार शास्त्राने वार; तरुण गंभीर जखमी

-

जळगाव संदेश लाईव्ह मराठी | जळगाव शहरातील सिंधी कॉलनीतील शासकीय वस्तीगृहाजवळ पैशाच्या वादातून एका तरुणावर तीन जणांनी पोटावर व छातीवर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेतील जखमी झालेल्या तरुणाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अविनाश किशोर जोशी उर्फ लिंबू चाट्या वय २८, रा जोशी कॉलनी, जळगाव असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील सिंधी कॉलनीतील शासकीय वस्तीगृहाजवळ पैशावरून झालेल्या वादातून एक अविनाश किशोर जोशी उर्फ लिंबू चाट्या या तरुणावर अज्ञात तीन जणांनी धारदार शास्त्राने छातीवर व पोटावर वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर मारेकरी घटनास्थळ तेथून पसार झाले आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याचे नातेवाईक व मित्र परिवाराने जखमीअवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशीला सुरुवात केली आहे. याबाबत पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

Related articles

ताज्या बातम्या