Sunday, December 22, 2024
Homeक्राईमसर्पदंश झाल्याने शेतमजूराचा मृत्यू; नातेवाईकांनी केला अक्रोश

सर्पदंश झाल्याने शेतमजूराचा मृत्यू; नातेवाईकांनी केला अक्रोश

-

धरणगाव – संदेश लाईव्ह मराठी । धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे शेतात काम करणाऱ्या शेतमजूराला सर्पदंश झाल्याने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान बुधवारी ७ ऑगस्ट रोजी पहाटे सव्वा दोन वाजता मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेंदरसिंग वारसिंग पावरा वय ४१ रा. खरगोन जि.बडवाणी मध्यप्रदेश ह.मु. झुरखेडा ता. धरणगाव असे मयत झालेल्या मजूराचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील झुरखेडा गावात गेंदरसिंग पावरा हा तरूण आपल्या कुटुंबासह गेल्या वर्षभरापासून वास्तव्याला होता. झुरखेडा गावातील किरण चौधरी यांच्या शेतात सालदारी म्हणून शेतात काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता ते शेतातून घरी येत असतांना त्यांना सर्पदंश झाला. त्यामुळे त्यांना गावातील काही ग्रामस्थांनी तातडीने धाव घेवून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचारा सुरू असतांना बुधवारी ७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि दोन मुले असा परिवार आहे.

Related articles

ताज्या बातम्या