जळगाव दिनांक २२ जून | जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील सागर हॉटेल समोरून एका हॉटेल व्यवसायिकाची रिक्षातून बॅटरी चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शुक्रवार २१ जून रोजी दुपारी २.३० वाजता नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. जाकीर मुल्ला कासार वय ४०, रा. नशिराबाद जि. जळगाव असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रदीप लक्ष्मण बोढरे वय-५८, रा. सूनसगाव रोड, नशिराबाद हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून सागर हॉटेल चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान शुक्रवार २१ जून रोजी दुपारी १२.३० वाजता त्यांनी त्यांची रिक्षा हॉटेल समोर लावलेली होती. त्यावेळी संशयित आरोपी जाकीर कासार याने रिक्षाची बॅटरी चोरून नेली. ही घटना उघडकीला आल्यानंतर प्रदीप बोढरे यांनी दुपारी २.३० वाजता नशिराबाद पोलिसात धाव घेऊन जाकीर मुल्ला कासार याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी जाकीर मुल्ला कासार याला अटक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन देशमुख करीत आहे.